🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 127*
https://sandeepbalgondapatil.blogspot.com
भारतात आजही काही दृष्ट प्रथा आहेत. या दृष्ट प्रथांमुळे अनेक दलित कुटुंबांना कधी मान-सन्मान लाभलाच नाही. उलटपक्षी पदरी अपमानच. पण, पदरी आलेले याच अपमानामुळे, काहीवेळा या प्रथा समूळ नष्ट झाल्या आहेत. अशीच एक वाईट प्रथा राजस्थानमधून हद्दपार करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आणि महिलांना स्वाभिमानाने जगण्याचे साधन उपलब्ध करून देणाऱ्या एका महिलेचा प्रेरणादायी प्रवास आपणासमोर सादर करणार आहे. चला तर मग जाणून घेऊ, ती महिला यशवंत कोण ??
1967 साली राजस्थानमधील एका खेड्यात, एका दलित कुटुंबात उषा चा जन्म झाला. त्या काळी राजस्थान अनेक वाईट रूढी परंपरांनी भरलेलं होतं. त्यातीलच एक वाईट प्रथा म्हणजे मैलापाणी उचलणे. हे काम उषाच्या कुटुंबाला करावे लागायचे. जेव्हा ती सात वर्षाची होती, तेव्हापासूनच तिला हे काम करावे लागले.
आणखी एक वाईट प्रथा म्हणजेच बालविवाह. या प्रथेला तीही बळी पडली. तेव्हा ती फक्त दहा वर्षाची होती. वयाच्या दहाव्या वर्षीच तिचा विवाह करण्यात आला.
लग्नानंतर मैलापाणी उचलण्याचे भोग संपतील. असे तिला वाटले. पण, कुठले काय ? तिला कुटुंब जगवण्यासाठी मैलापाणी उचलण्याचे काम करावेच लागले. बरं ! हे काम करताना कोणताही सन्मान तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या वाट्याला आलाच नाही. पण, ज्यावेळी मान घेण्याची वेळ आली, त्या प्रत्येक वेळी तिला अपमानितच व्हावे लागले.
उषा ला आता हे सारे नकोसे झाले होते. तिच्यासारख्या असंख्य महिलांच्या वाट्याला असेच दुःख आणि वेदना होत्या. त्यामुळे हे भोग संपावे. असे तिला मनापासून वाटे.
उषाला या दलादलीतून बाहेर पडायचं होतं. तिला सन्मानाने,अभिमानाने आणि स्वाभिमानाने आयुष्य जगायचं होतं. एखाद्या व्यक्तीने मनापासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतंच. नेमकं तिच्या बाबतीत हे खरं ठरलं. सुलभ इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून तिला संधी मिळाली आणि या संधीचं तिनं सोनं केले. याच संस्थेने तिला आणि तिच्या सारख्या असंख्य महिलांना रोजगाराचं साधन आणि सन्मानाचे जीवन उपलब्ध करून दिलं.
'सुलभ' मुळं तिचं जीवन 'सुलभ' झालं. या संस्थेत काम करता करता, ती सुलभ इंटरनॅशनल या संस्थेची अध्यक्ष बनली. सुलभ इंटरनॅशनलच्या सहकार्याने तिने राजस्थान मध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली. मैलापाणी वाहून नेण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद व्हावी. यासाठी ती प्रयत्नशील आहे. तिच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने 2020 सालचा पद्मश्री पुरस्कार देऊन उषाचा गौरव केला आहे. ती उषा म्हणजेच उषा चौमार होय.
या जगात ज्यांच्या वाट्याला अपमानाचे जगणे आलेले आहे, त्यांनीच इतिहास घडवलेला आहे. मग ते म. गांधी असोत डॉ.आंबेडकर असोत अथवा उषा चौमार. आयुष्य जगत असताना बऱ्याचदा आपल्याला अपमान सहन करावा लागतो. परंतु, अशा नकारात्मक प्रसंगातून देखील सकारात्मक ऊर्जा घेऊन, आपण पुढे गेलो तर आपण यशाच्या शिखरापर्यंत नक्कीच पोहोचू. जीवनात अनेक संधी, आपलं आयुष्य बदलण्यासाठी उभ्या असतात. या संधी जाणंणं आणि त्यांचं सोनं करणं. हे फक्त आपल्या हाती असतं. सुलभ इंटरनॅशनल या संस्थेच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचे उषा चौमार यांनी सोनं केलं म्हणूनच त्या आज पद्मश्री आहेत.म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.
आजच्या या भागातून तुम्हाला कोणता बोध मिळाला ? हे मला नक्की कळवा.
इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.
धन्यवाद,
*श्री संदीप पाटील, दुधगाव.*
*9096320023.*
🎯 उषा चौमार यांच्या फोटोसाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/03/127.html
🎯 भारत-पाकिस्तान च्या फाळणीनंतर भारतात आलेल्या एका बारा वर्षाच्या, दुसरी नापास शीख मुलाचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास, आपणा सर्वांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तो यशवंत कोण ? जाणून घेण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/03/126.html
🎯 ब्लॉगवर वाचकांच्या सर्वाधिक पसंतीस पडलेली पोस्ट वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2019/07/102.html

2 comments:
तुझा हा यशवंत लिहिण्याचा प्रकार नक्कीच प्रत्येकाला ऊर्जा देऊन जाईल...
तुझा हा यशवंत लिहिण्याचा प्रयत्न नक्कीच प्रत्येकाला ऊर्जा देऊन जाईल...
Post a Comment