Sunday, December 18, 2022

असा हा कर्मवीर - कथा क्र.4 - पाटील मास्तर

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 असा हा कर्मवीर - कथा क्र.4 - पाटील मास्तर

🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.



वडिलांनी पाहुण्यांसमोर कर्मवीरांचा अपमान केला. रागारागाने ते साताऱ्यात आले व खासगी शिकवण्या घेण्यास सुरुवात केली.


कर्मवीरांना मिळालेला पहिला विद्यार्थी अभ्यासात अगदी 'ढ' होता. त्यांना त्यावेळी दुसरे काहीच काम नव्हते. त्यामुळे ठरलेल्या एका तासाऐवजी चांगले दोन-तीन तास ते त्या मुलावर खर्च करू करायचे. मुलाच्या आईला त्याचे फारच कौतुक वाटले. खूप चांगले शिक्षक म्हणून, तिने शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे कर्मवीरांची शिफारस करायला सुरुवात केली. 


कर्मवीरांना भराभर शिकवण्या मिळू लागल्या. त्यांचं संपूर्ण लक्ष शिकवण्यावर केंद्रीत केलं होतं. हाती घेतलेल्या कामासाठी कितीही कष्ट घ्यायची. त्यांची तयारी असायची. भल्या पहाटे कंदील घेऊन, ते बाहेर पडत आणि अगदी रात्री उशिरा घरी परतत. दिवसभर आठ-दहा शिकवण्या घेत.


एकदा पेठे नावाचे सरकारी अधिकाऱ्याने मुलाला संस्कृत शिकविण्यासाठी कर्मवीरांना विचारले. मागचा-पुढचा विचार न करता त्यांनी होकार दिला. पण, कर्मवीरांना संस्कृत मध्ये शिकविण्याची फारशी गती नव्हतीच. यासाठी त्यांनी साताऱ्यात गजेंद्रगडकर शास्त्री यांच्याकडे संस्कृतची शिकवणी लावली. कर्मवीर रोज सकाळी पाच वाजता शास्त्रींच्या घरी जायचे. शास्त्रीं जे शिकवत, तेच नंतर पेठेंच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाला शिकवत. त्यामुळे 'पाटील मास्तर' याच नावाने ते ओळखले जाऊ लागले.


पुढे यांचं शिकवण्यांनी रयत शिक्षण संस्थेची पायाभरणी केली. कर्मवीरांचे चरित्र अभ्यासताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू पाहायला मिळतात, त्यापैकीच एक म्हणजे कष्ट करण्याची जबर तयारी. हाती घेतलेल्या कार्यासाठी अतोनात कष्ट करण्याचा त्यांचा बाणा होता. एखादी गोष्ट करायचं ठरवलं, तर पूर्ण करूनच थांबायचं. असा त्यांचा स्वभाव होता. म्हणूनच, त्यांना रयत शिक्षण संस्था स्थापन करता आली आणि नेटाने पुढे नेता आली. 


दुधगांव ता.मिरज, जि.सांगली येथे कर्मवीर अण्णांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण लोकसहभागातून सुरू आहे. या सुशोभीकरणाच्या आपण खारीचा वाटा उचलावा. हीच विनंती. आपली देणगी खालील खात्यावर पाठवू शकता.


कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली.

शाखा-दुधगाव

ACCOUNT HOLDER NAME:

KARMVEER PUTALA SUSHOBHIKARAN SAMITI DUDHGAON

IFSCCODE:

ICIC0000104

ACCOUNT NO:

KBNP33UV3RH52219


*संपर्क*

श्री. दिपक अथने - 8857 03 61 08

श्री. कैलास आवटी - 9595 23 76 76

श्री. तेजकुमार कोले - 9403 23 04 41


कथा क्र.1

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2022/11/blog-post_27.html


कथा क्र.2

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2022/12/2.html


कथा क्र.3

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2022/12/blog-post.html


धन्यवाद...!!!

No comments: